'टाईमपास'

पौगंडावस्थेतील निरागस प्रेम अनुभवायचं असेल तर एकदा 'टाईमपास' बघाच !!

आजवर आपल्याला Matured प्रेम कहाण्या बघायची सवय आहे. म्हणजे हिंदी असो वा मराठी महागडी तिकीटे काढून थिएटर मध्ये जावं तर प्रत्यक्षात तिशी (कधी कधी चाळीशी सुद्धा) पार केलेल्या पण पडद्यावर गेल्या बऱ्याच वर्षांपासून १६ टे २५ वयोगटाच्या युवक-युवतींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांच्या प्रेमकहाण्या पाहाव्या लागायच्या...पण 'teen ages' चं काय..??

पौगंडावस्थेत ज्यावेळी प्रेमाची अंकुरे फुलू लागतात तेव्हा पांढरपेशा समाज आणि आता तर चार बुकं शिकून शहाणा झालेला सगळाच समाज त्याला 'लैंगिक आकर्षण' असं गोंडस नाव देऊन मोकळा होतो. पण ते तसं प्रत्येक वेळीच नसतं असा विश्वास 'टाईमपास' हा बहुचर्चित सिनेमा देऊन जातो.

न विसरता येणारं पाहिलं प्रेम..तो उमलण्याचा काळच असा असतो कि त्याला जात-पात, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ट हि कसलीच कुंपणं माहित नसतात..त्याला फक्त वाहणं माहित असतं..त्या अदृश्य कुंपणांच्या जाळ्यांतून... आजवर केवळ ऐकलेलं नुकताच वयात आलेला नवतरुण जेव्हा स्वत: 'feel ' करू लागतो..तेव्हा सारं जग त्याला वेगळं भासू लागतं..छान छान वाटू लागतं...पण या छान छान जगात जेव्हा वास्तवाचा निखारा खदखदू लागतो..तेव्हा येणारं शहाणपण माणसाला 'पोक्तपणा' कडे झुकवते..किंवा मग आयुष्याला वेगळीच कलाटणी देते..कधी कधी कायमसाठी..'टाईमपास' हा चित्रपट याच सर्व प्रवासातून जातो...

इथे कुणीही मोठा (म्हणजे तसं वय झालेला) हिरो वा हिरोईन नाही. पडद्यावरचा झोपडपट्टीत राहणारा दगडू आणि इमारतीत राहणारी प्राजक्ता यांमध्ये थिएटर मध्ये बसलेला 'teen' स्वतःला शोधू लागतो. Nostalgic होतो..चित्रपटात वेळोवेळी येणाऱ्या punches ना मनमुराद दाद देतो..खुर्चीवर लोळून लोळून हसतो..आणि हेच चित्रपटाचे यश आहे.. 'शेवट थोडा अजून वेगळा असता तर बरं झालं असतं' असं एकदा वाटून जातं पण चित्रपटाचा आता 'part २' सुद्धा येणार हि भावना तो विचार मनातून काढून टाकते उत्सुकता वाढवते..

बाकी "आईबाबा आणि साईबाबाची शपथ..पुन्हा एकदा पहिल्या प्रेमाची आठवण आणि पौगंडावस्थेतील निरागस प्रेम अनुभवायचं असेल तर एकदा 'टाईमपास' बघाच.

लेख- गौरव गायकवाड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या