प्रकाशित पुस्तके

सर्व पुस्तकांच्या संकल्पना, नाव, रचनांचे हक्क राखीव.

मैत्र जीवांचे
लेखक : अभिषेक ज्ञा. ठमके
ई-पुस्तक आय.एस.बी.एन. नंबर : 978-1-310881-96-1
मैत्र जीवांचे ही मैत्रीवर आधारित एकविसाव्या शतकातील आधुनिक कादंबरी आहे. या मध्ये मैत्रीशिवाय तंत्रज्ञान, संगीत, भारतीय संस्कृती, गुगल, जर्मनी संस्कृती, ऑस्ट्रेलियन संस्कृती अशा अनेक गोष्टींची माहिती कथेच्या आधारे देण्यात आली आहे. कादंबरी आपल्याला हसवते आणि रडवते देखील. लेखकाने कादंबरी मधील रहस्य अगदी शेवटपर्यंत सांभाळून ठेवले आहे. आधुनिक समाजाला आवडणारी ही एक दर्जेदार मराठी कादंबरी आहे. सदर कादंबरी पाहता मराठी लेखाकामध्ये असलेली वास्तव्यता आपल्या लक्षात येते. 'मैत्र जीवांचे' कादंबरी मध्ये मराठीसह हिंदी, इंग्रजी, जर्मन, पौर्तुगीज, आफ्रिकन भाषांचा वापर अर्थासह करण्यात आला आहे, ज्यातून लेखक वाचकाला कादंबरीशी एकरूप ठेवतो.
______________________________________________________________________
प्रबोधन - जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया
संपादक : गौरव गायकवाड, निलेश कळसकर, अभिषेक ठमके
प्रबोधन - जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया हा वैज्ञानिक दृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेला फेसबुकवरील एक समुह आहे. सदर समूहाने आपल्या नावाप्रमाणेच प्रबोधन करत आपले पहिले ई-पुस्तक प्रकाशित केले. ह्या ई-पुस्तकामध्ये ८१ लेखकांनी आपले विचार मांडले आहेत.
______________________________________________________________________
महाराष्ट्रातील संत
संपादक : अभिषेक ज्ञा. ठमके
ई-पुस्तक आय.एस.बी.एन. नंबर : 978-1-311465-71-9
वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा पंथ आहे.वारकरी पंथातील संतानी मराठी भाषेत विपूल अशी ग्रंथसंपदा,काव्यसंपदा निर्माण केली आहे. या संप्रदायात सर्व जातिधर्माचे अनुयायी आहेत.वारकरी पंथाचे दैवत असलेले पंढरपुरचे विठ्ठल मंदिराच्या बांधकामाच्या कालखंडाविषयी व मंदिर कोणी बांधले याविषयी वादविवाद आहेत. काहींच्या मते ते कर्नाटकच्या होयसाल राजाने बांधले,तर काहींच्या मते ते राष्ट्रकुट राजा अविधेयने बांधले आहे.वारकरी पंथाच्या संतानी समाजातील विषमतेवर आपल्या अभंगातून प्रहार केले.संत चोखामेळा,संत ज्ञानेश्वर,संत सावता माळी,संत तुकाराम,संत एकनाथ,संत गोरा कुंभार आदि विविध जातिधर्मातील संतानी या पंथाचा प्रसार महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर केला. अशा आपल्या समृद्ध संत परंपरेबद्दल माहिती मिळवण्यासाठी हे एक छोटेसे पुस्तक उपलब्ध केले आहे. अभ्यासू व्यक्तींना पुढील माहितीचा लाभ व्हावा अशी अशा करतो.
______________________________________________________________________


अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१३
संपादक - अभिषेक ठमके
नोव्हेंबर महिना म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये उत्सुकता असते ती दिवाळी अंकाची. दिवाळी अंक हे नाव ऐकूनच आपल्याला समजतं की नक्कीच आपल्याला काहीतरी नवीन वाचावयास मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी शेकडो दिवाळी अंक निघत असतात. मात्र एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे जागतिकीकरणामुळे अनेक महाराष्ट्रीयन आणि मराठी नागरिक इतर देशात स्थायिक झाले आहेत. त्यांना देखील दिवाळी अंकाबाबत तितकीच उत्सुकता असते जितकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला. म्हणून 'अर्थ मराठी'ने इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात स्थायिक झालेल्या नागरिकांना दिवाळी अंकाचा आस्वाद घेण्याची संधी दिली आहे.

सदर दिवाळी अंकासाठीचा वाचकवर्ग हा जागतिक स्तरावरील असल्याने त्यामध्ये जगातील विविध देशातून मराठी लेखक, कवी यांनी आपले लेख पाठवले आहेत. इंटरनेटवरील अनेक मान्यवर तसेच उमदे लेखक यांचे लेख या दिवाळी अंकामध्ये आहेत. जगातील वेगवेगळ्या ठिकाणातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
______________________________________________________________________


ओलांडून जाताना
लेखक : ओमकार मंगेश दत्त
संपादक : अभिषेक ठमके
ई-पुस्तक आय.एस.बी.एन. नंबर : 978-1495436741
सदर पुस्तकाचे लेखक आहेत ओमकार मंगेश दत्त...लेखकाने २०१० मध्ये सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'इरादा पक्का' सिनेमाचे स्क्रीनप्ले लिहिले आहेत. तसेच मराठी मालिका 'वरचा क्लास' चे देखील स्क्रीनप्ले लिहिले आहे. त्यांनी हिंदी सिनेमा 'तो बात पक्की' आणि मराठीतील ऑल टाइम सुपरहिट 'अगं बाई अरेच्चा' सिनेमामध्ये असिस्ट-डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी 'बकुळा नामदेव घोटाळे' आणि 'माझा नवरा तुझी बायको' सिनेमा मध्ये देखील काम केले आहे.
______________________________________________________________________
वेडा आणि कार्टून
लेखक : अभिषेक ज्ञा. ठमके
एनिमेशन हा आत्ता आपल्याला माहित असलेला विषय आहे. 'वेडा आणि कार्टून' ही कादंबरी एका गरीब मुलाची कथा आपल्यासमोर आणते. लिहिता वाचता न येणर्या त्या मुलाचा परिस्थितीशी असा संघर्ष होतो की, त्याच्या जिद्दीपुढे अनेक अनपेक्षित गोष्टींना माघार घ्यावी लागते. परिस्थितीमुळे कथेतील नायकाला एनिमेशनचं शिक्षण घेत येत नाही. मात्र त्याची त्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची जिद्ध असते. आपल्या कल्पनाशक्तीवर तो असंख्य कथा, संकल्पना तयार करतो आणि वेडा म्हणून हिनविला गेलेला तो एनिमेटर म्हणून काम करण्याऐवजी भारतातील मोठ्या एनिमेशन संस्थेचा संस्थापक होतो.
______________________________________________________________________

आयुष्य हीच शिक्षा
लेखक : अभिषेक ज्ञा. ठमके
अनेक दशकांपासून स्त्रियांनी पुरुषांचा जुलमी अत्याचार सहन केला आहे. परंतु, 'आयुष्य हीच शिक्षा' कादंबरी पुरुषांच्या व्यथेची कथा आपल्यासमोर आणते. स्त्री ही पुरुषांपेक्षा मानसिक स्थितीत भक्कम असते, मात्र पुरुष जितका शारीरिक बाबतीत ठीक असतो, तशी त्याची मानसिक स्थिती स्त्रीपेक्षा कमकुवत असते. त्यातच जर एखादी स्त्री पुरुषाला समजून घेत नसेल तर पुरुष हा आत्महत्येसारखा मार्ग सुद्धा निवडू शकतो. स्त्रीशिवाय पुरुष हा वेडापिसा होतो आणि जेव्हा एखाद्या स्त्रीमुळे आपल्या जवळची व्यक्ती कायमची गमावून बसल्याने त्या पुरुषात कसा बदल होतो हे ही कादंबरी आपल्यासमोर आणते. सदर कादंबरी ही 'मैत्र जीवांचे' तसेच 'वेडा आणि कार्टून' या दोन्ही कादंबरीप्रमाणे गुंतागुंतीची आणि रहस्यमय आहे.
______________________________________________________________________

कुटुंब
लेखक : अभिषेक ज्ञा. ठमके
प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, राग, भांडण, असंख्य भावना आपल्याला कुटुंबात अनुभवता येतात. प्राप्त परिस्थितीत आपली संस्कृती टिकवण्याच कार्य कुटुंब करते. समोर असंख्य अडचणी आणि आव्हाने असतील तर त्यांचा सामना करण्यासाठी जे प्रोत्साहन हव असतं त्यात कुटुंबाची भूमिका मोठी असते. अनेक पिढ्यांचा संस्कारांचा वारसा कुटुंब पुढे नेत असतं. 'कुटुंब' कादंबरी अशीच एक भावनिक कादंबरी आहे.