मराठी सुविचार संग्रह

सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. हेच माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. जीवन कसं जगावं हे सुविचार शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे.


व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर
दिसण्याला काहीच अर्थ नाही, 
कारण सुंदर दिसण्यात
अन असण्यात
खूप फरक असतो.



मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.



जीवनात चांगला माणूस
होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.



कारण सांगणारी लोकं यशस्वी होत नाहीत आणि,
यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत



“नाही”
हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.



आपल्या नियतीचे मालक बना,
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.



 चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, 
पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
स्वतःलाच चालावे लागते.



कासवाच्या गतीने का होईना 
पण रोज थोडी थोडी प्रगती करा, 
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.



न हरता, न थकता, न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरतं.



आज मी
निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.



कोणतेही कार्य 
अडथळ्याशिवाय
पार पडत नाही. शेवटपर्यंत जे
प्रयत्न करतात त्यानांच
यश प्राप्त होते.



भरलेला खिसा
माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा
मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.



ज्याच्याजवळ उमेद आहे
तो कधीही हरू शकत नाही.


चुकणं ही ‘प्रकृती’, मान्य करणं ही ‘संस्कृती’
आणि सुधारणा करणं ही ‘प्रगती’ आहे.



शब्दांपेक्षा शांत राहूनच
जास्त आक्रमक होता येत.



नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा
आणि हे करून देखील
ते तुमची कदर करत नसतील
तर तो त्यांचा दोष आहे
तुमचा नाही.



जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि
कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.



कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही,
हे जरी खरे असले तरी,
कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, 
अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.


प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी
वाईट वागतात, त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे,
ते चांगले आहेत म्हणून नाही, 
तर तुम्ही चांगले आहात म्हणून.



मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवी कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते तर, 
जपवणूक आयुष्यभरासाठी.



जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते,
त्याचा तिरस्कार कधीच करू नका. 
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला 
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.


नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष 
स्वीकारण्यात आहे कारण,
एकही दोष नसलेल्या 
माणसाचा शोध घेत बसलात, 
तर आयुष्यभर एकटे राहाल.



विश्वास
हा खोडरबर सारखा असतो 
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर 
तो कमी होत जातो.



अडचणीत असतांना
अडचणीपासून दूर पळणे, 
म्हणजे अजून मोठ्या
अडचणीत जाण्यासारखेच आहे.



सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते 
ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात 
ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.



स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.


आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका, 
कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते.
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही, ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.



मानवाचा दानव होणे ही त्याची हार, 
मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार 
आणि मानवाचा माणूस होणे,
हे त्याचे यश आहे.



सत्य
ही अशी एक श्रीमंती आहे, 
जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो..
असत्य
हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते..



कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर 
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. 
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.



कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, 
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधारण्याची संधी.



शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे,
आणि हृदयाला भावनेकडे, वळविणे म्हणजे
शिक्षण.



जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, 
हसा इतके कि आनंद कमी पडेल, 
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, 
पण प्रयत्न इतके करा कि,
परमेश्वराला देणे भागच पडेल.



माणसाला दोनच गोष्टी
हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं,
आणि दुसरी भेटलेली माणसं.



यशाकडे नेणारा
सर्वात जवळचा मार्ग 
अजून तयार व्हायचा आहे.



 भूक आहे तेवढे खाणे ही
प्रकृती, 
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही
विकृती,
आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून, 
दुसऱ्याची भूक भागवणे ही
संस्कृती.



डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाही, 
भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत.



जिंकणे म्हणजे
नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट
पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.



 या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना
तुम्ही बाळगलेला संयम
आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना
तुम्ही दाखवलेला रुबाब



छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, 
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची 
खात्री देऊ शकत नाही पण,
संघर्ष करण्याची
प्रेरणा नक्की देऊ शकतो.



तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात,
यात तुमचा काहीच दोष नाही पण,
जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर,
हा नक्कीच तुमचा दोष असेल.



विचार असे मांडा की,
तुमच्या विचारांवर कुणीतरी,
विचार केलाच पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या